लियाफी संघटनेने पुकारलेले देशव्यापी असहकार आंदोलन औसा शहरात शंभर टक्के यशस्वी
शेख बी जी
औसा: दि.1- लियाफी या एल आय सी तील विमा प्रतिनिधींच्या न्याय हक्कासाठी झटणा-या संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी दि.30 सप्टेंबर रोजी असहकार आंदोलन औसा येथे शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा येथील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
मागील अनेक महिन्यापासून लियाफी संघटना आपल्या विमा प्रतिनिधींच्या न्याय मागण्या संदर्भात एल आय सी, ईर्डा यांच्याशी चर्चेच्या माध्यमाद्वारे प्रयत्न करत आहे. तथापि,आतापर्यंत झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने लियाफी संघटनेने टप्प्याने असहकार आंदोलन छेडून आपली भूमिका वरिष्ठांपर्यंत कळविण्याचा प्रयत्न केला आहे.
आज सकाळपासूनच औसा शाखेसमोर विमा प्रतिनिधिनी नो बीओसी,नो रिनीव्हल,नो प्रिमीयम प्वाइंट,नो रिनुवल,नो ग्रीन चैनल व नो आनन्दा यावर आपले आंदोलन सकाळी १० ते सायंकाळी ५-३० पर्यंत सुरु ठेवले होते.

0 Comments