Latest News

6/recent/ticker-posts

देशाचे शारीरिक,बौद्धिक भविष्य घडविणाऱ्या कार्यालयाला घाणीचा विळखा अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांना मरण यातना

देशाचे शारीरिक,बौद्धिक भविष्य घडविणाऱ्या कार्यालयाला घाणीचा विळखा अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांना मरण यातना

बि .डी. उबाळे 

औसा: औसा तालुक्याच्या ठिकाणी आणि वरदळीच्या भागांमध्ये असणारे शिक्षण खात्याचे गट साधन केंद्र(बी ओ) ऑफिस आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना अधिकारी यांचे कार्यालय शासनाच्या बंद आणि मोडखळीस आलेल्या इमारतीमध्येच ठेवण्यात आले आहे परंतु या कार्यालयाचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कारण या ठिकाणी हे दोन्ही कार्यालय हे देशाचे आरोग्य आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम असे देश घडविण्याचे काम करणारे मुख्य कार्यालय आहेत यामध्ये एक कार्यालय आहे लहान मुलांना शिक्षण देऊन मन तंदुरुस्त करणे आणि देश सेवा आणि देशभक्ती शुद्ध करणे जेणेकरून देशाचे भविष्य आरोग्यकारक राहील असे कार्यालय या घाणीच्या विलख्यामध्ये आहे तर दुसरे कार्यालय आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अधिकारी यांचे या ठिकाणीही दररोज मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका मदतनीस आणि कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते परंतु या कार्यालयाकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते कारण या भागातून त्या कार्यालयाकडे एन्ट्री करत असतानाच सुरुवातीलाच भाजी मार्केट यांची मोठी वर्दळ असून गेटमध्ये प्रवेश करताना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत असते कारण या ठिकाणी दुचाकी आणि भाजीपाला विकणाऱ्या शेतकरी व्यापारी आणि अवैध प्रवासी वाहतूक करणारी खाजगी वाहने यांचा भरणा या गेटच्या समोर मोठ्या प्रमाणात केल्याने दैनंदिन कर्मचारी आणि कामानिमित्त आलेले महिला कर्मचारी यांना या रहदारीचा आणि आत मध्ये दुर्गंधी युक्त सडका भाजीपाला सह या ठिकाणी उपलब्ध किंवा वावरणारे बहुतांश नागरिक गेटच्या आत मध्ये येऊन आपला नैसर्गिक विधी बिनधास्तपणे आटोपून बाहेर जातात.

 यामुळे हा भाग अती दुर्गंधीयुक्त झाला असून याकडे नगरपरिषद औसा यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत या कार्यालयातील कर्मचारी तथा कामानिमित्त जाणारे नागरिक महिला पुरुष आधी सर्वांकडून ही दुर्गंधी आणि गेट समोर होत असलेली गर्दी हटविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments