औशात अनोखा उपक्रम सोडतीद्वारे नवदुर्गाचा मान-सन्मान
बी. डी.उबाळे
औसा: शारदीय नवरात्र महोत्सव तसेच राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा निमित्त औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी सौ शोभाताई पवार यांच्या संकल्पनेतून चिठ्ठ्यांची सोडत काढून नवदुर्गेची निवड करून नवदुर्गाचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृह औसा येथे आयोजित करण्यात आला. प्रभाग क्रमांक 7 मधील शेकडो महिलांनी नाव नोंदणी करून या कार्यक्रमात सहभाग घेतला. सहभागी झालेल्या प्रत्येक महिलांच्या नावाच्या चिठ्ठ्या करून लहान मुलाच्या हस्ते चिट्ठी काढून विजेत्या नवदुर्गेला पैठणी, शाल, श्रीफळ देऊन सौ शोभाताई पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यामध्ये सौ गंगुबाई सुरेश कांबळे या महिला विजेत्या ठरल्या. याप्रसंगी सौ शोभाताई पवार म्हणाल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या असून पंतप्रधानाच्या प्रत्येक कार्याचे कौतुक करण्यासारखे आहे त्यामुळे महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी लघुउद्योग व महिला बचत गटाच्या माध्यमातून कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीस मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. व्यासपीठावर माजी नगरसेविकास सौ प्रमिला राम कांबळे, सौ सुनीता कांबळे, सौ रुपाली धानुरे यां उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष सौ.जयश्री घोडके यांनी केले. या खास महिला विशेष आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण औसा तालुक्यामध्ये सुरू आहे.


0 Comments