नवरात्रीनिमित्त बोरगाव(न)येथे आयसीआयसीआय फाउंडेशन कडून 100 केशर आंब्याची लागवड
बी.डी.उबाळे
औसा: बोरगाव तालुका औसा येथे नवरात्रीचे औचित्य साधून "संवर्धन वसुंनधरेचे" असे आयसी आय सी आय फोंडेशन कडून ग्राम पंचायतीस केशर आंबा 100 रोप भेट देण्यात आली. या वृक्षची लागवड नवदुर्गा महिला बचत गटाच्या माध्यमातून वृक्षरोपण करून साजरा करण्यात आली. देवी नवदुर्गा मातेला या नवरत्र मोहत्सवात वेगवेळ्या नऊ रंगाचा शालू नेसवून पूजा आर्चा करण्याची ग्रामीण प्रथा आहे.
पण वसुंधरेला हिरवा वृक्षरूपी शालू नेसून , धरणी मातेला हिरवळ देण्याचे काम आयसी आय सी आय फाऊडेशन करत आहे. या नवरात्रीच्या निमित्ताचे औचित्य साधुन आय सी आय सी आय फाउंडेशनच्या माध्यमातून आंबा वृक्ष लागवड करून साजार करण्यात आला. तर आनंद सूर्यवंशी सी एफ आय सी आय सी आय फौंउनडेशन यांनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमास ग्रामपंचायत बोरगाव चे ग्रामसेवक प्रकाश सवाई, सरपंच अनिल सुतार, विविध बचत गटाच्या महिला, सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments