ड्रोनने केली भादा वृक्ष लागवडीची पाहणी
बी. डी. उबाळे
औसा: औसा तालुक्यातील भादा येथे यावर्षी 15 ते 20 हजार अशी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे,याचा लातूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्यामध्ये आदर्श ठरावा असा यशस्वी पॅटर्न भादा गावामध्ये राबविला जात आहे.
यामुळे याचा बोलबाला आणि प्रसिद्धी लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये सोशल मीडिया आणि फेसबुकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असून याची दखल घेत जिल्हास्तरीय प्रशासनाकडून औसा तालुक्यामधील यशस्वी ग्रामपंचायत पाहणी ही ड्रोन द्वारे शनिवार दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2:00 वाजेच्या दरम्यान करण्यात आली आहे.
यामध्ये औसा तालुक्यातील दोन गावांची निवड करण्यात आली होती. यामध्ये उटी(बू) आणि भादा या दोन गावांची पाहणी ड्रोन द्वारे करण्यात आली आणि संबंधित टीमने या गावांमध्ये जाऊन फोटोसेशन आणि व्हिडिओ शूटिंग आधी आवश्यक बाबी बाबत त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य राबविले असून सदरील कामाची पाहणी त्यांनी प्रत्यक्षरीत्या केली आणि ते व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून व्हिडिओ द्वारे चित्रीकरण कैद करून ते वरिष्ठांना सादर करणार असल्याचे समजते.
यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्या आणि कशा पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात येते यामध्ये बिहार पॅटर्न वृक्ष लागवड आणि मीया वाकी/घण दाट वृक्ष लागवड सह फळझाड मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.
हे लागवडीची पाहणी प्रत्यक्षरीत्या टीमने केली असून याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार असल्याचे समजते. यावेळी भादा या गावी आलेल्या टीमला मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासाठी उटी ग्रामसेवक महेश जगताप आणि ग्राम पंचायत कर्मचारी हजर होते तर भादा येथे उपसरपंच बालाजी शिंदे उर्फ बी एम ग्राम विकास अधिकारी मानिक सूर्यवंशी, बालाजी दे. उबाळे,ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे, योगेश लठुरे आणि ग्रामपंचायत कर्मचारी लखन लतुरे, ब्रम्हानंद स्वामी, नंदू फरतळे उपस्थित होते.

0 Comments