अहेमद रसूलसाब तांबोळी यांचे दुःखद निधन
लातूर: खोरी गल्ली येथे अहेमद रसूलसाब तांबोळी यांचे वयाच्या 72 व्या वर्षी रात्री उशिरा साधारणता 1:30 हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले. इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन मूळचे शेळगाव ता. चाकूर येथील शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ कर्मचारी अहेमद रसूलसाब तांबोळी हे पंचक्रोशीत सर्वपरिचित होते. इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ मार्गदर्शक होते त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज दि. 11 नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी( नमाज अदा झाल्यानंतर ) दुपारी 1:30 वाजता हमाल गल्ली, लातूर येथील कब्रिस्तान मध्ये दफन विधी (अंतीमसंस्कार) करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन सुना व तीन मुली, जावई नातू-पणतू असा मोठा परिवार आहे. प्रा. डॉ. फारुख तांबोळी यांचे वडील होत. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

0 Comments