Latest News

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षेत भादा जिल्हा परिषद शाळेचे यश; विद्यार्थी, शिक्षकाचे अभिनंदन

शिष्यवृत्ती परीक्षेत भादा जिल्हा परिषद शाळेचे यश; विद्यार्थी, शिक्षकाचे अभिनंदन

बी डी उबाळे

औसा: जिल्हा परिषद प्रशाला भादा व कन्या प्रशाला भादा ता.औसा जि. लातूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले यश संपादन केल्याने विद्यार्थी शिक्षक यांचे अभिनंदन केले जात आहे. येथील एकूण 11 विद्यार्थी पात्र झालेले आहेत.

यामध्ये प्रशाला भादा मधील मुले- रमण गायकवाड, प्रणव माळी, सावन पवन कोलते, तबरेज सय्यद, आर्यन शिंदे आणि कन्या प्रशाला भादा शाळेतील मुली- गायत्री देवरे, सुहाना शेख, श्रावणी घोडके, अनुष्का शिंदे, अंजली कठारे, जोया मुलानी या विद्यार्थिनींनी हे संपादन केले त्यामुळे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रमोद माळी, किशोर जगताप, दीपक शिवपुजे, मंठाळे मॅडम आणि शाळेचे मुख्याध्यापक मोहन माकणे यांचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments