हरिओम लांबोटेचे कोल्हापूर जिह्यात स्कॉलरशिप परीक्षेत यश
निलंगा: तालुक्यातील माचरटवाडी येथील हरीओम रमेश लांबोटे या विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी वर्गात स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश मिळवले आहे.
वरद गुरुकुल विद्यानिकेतन सांगवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी शिकत असलेल्या हरीओम लांबोटे यांनी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत 298 पैकी 192 मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
यामुळे गावची मान उंचावली आहे. परिसरामध्ये या विद्यार्थ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

0 Comments