Latest News

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय तायक्वांदो कॅडेट स्पर्धेत लातूर संघाला 1 रौप्य व 2 कांस्य पदक

राज्यस्तरीय तायक्वांदो कॅडेट स्पर्धेत लातूर संघाला 1 रौप्य व 2 कांस्य पदक

लातूर : दि 31 जुलै चंद्रपूर येथील भद्रावतीत नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो कॅडेट स्पर्धेत लातूर संघाला एक रजत तर दोन कांस्य पदक प्राप्त झाले असुन बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत खेळाडुंनी उत्तम प्रदर्शन केले आहे.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर व चंद्रपूर तायक्वांदो जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या अनुदानित तायक्वांदो या खेळाच्या दि 19 ते 21 जुलै दरम्यान राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर बीड येथे दि 25 ते 27 जुलै दरम्यान राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही स्पर्धेत लातूर संघाचे उत्कृष्ट प्रदर्शन राहिले असुन कॅडेट स्पर्धेत श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाची कु सृष्टी राहुल कांबळे हिला कांस्य, श्री राजानारायनलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या ओम माळगे याला रजत तर श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या आदित्य शर्मा याला कांस्य पदक प्राप्त झाले आहे.

विजेत्या खेळाडुंना तायक्वांदो आशियाई प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंच नेताजी जाधव, जान्हवी मदने व एस व्ही कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले तर पदक प्राप्त खेळाडुंचे तायक्वांदो जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष प्रयागराज गरुड, मार्गदर्शक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर श्री मारवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेशजी लाहोटी, बंकटलाल लाहोटी शाळेचे मुख्याध्यापक प्रधांत बुक्कावार, राजा नारायनलाल लाहोटी शाळेचे रजिस्ट्रार प्रविण शिवणगिकर केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक पि पि कुलकर्णी, क्रीडा शिक्षक सुनिल मुनाळे, गणेश इगवे, जहांगीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments