Latest News

6/recent/ticker-posts

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदेची स्थापना व शपथ विधी सोहळा

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदेची स्थापना व शपथ विधी सोहळा


अहमदपूर : तळेगाव येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दि. २ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी ११:०० वाजता नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी परिषदेची स्थापना व शपथ विधी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, प्रमुख पाहुणे मॅनेजमेंट ट्रस्टी रक्षा मद्देवाड यांची प्रमूख उपस्थिती लाभली. तसेच प्राचार्या जेबाबेरला नादार, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचीही उपस्थिती होती. 

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचा ब्रँड ग्रुप बँड ताशाच्या गजरात शानदार असे अतिथींचे आगमन झाले. सरस्वती पूजन करून प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इयत्ता दहावीचा विद्यार्थी हेरीक नादार तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून स्वाती हाके यांची निवड करण्यात आली. ही निवड लोकशाही मार्गाने मतदानाद्वारे करण्यात आली होती. सफायर हाऊस कॅप्टन कुमारी शरयू पाटील, एमरल्ड हाऊस कॅप्टन कुमारी आरुषी चेपुरे, पर्ल हाऊस कॅप्टन कुमार चैतन्य रेड्डी, रुब्बी हाऊस कॅप्टन ज्ञानेश्वर जाधव यांची निवड करण्यात आली. स्पोर्ट्स कॅप्टन इयत्ता नववीमधून जानवी कदम, आदिती खोमणे, पियुष पस्तापुरे, ओमकार बुंद्राळे यांची निवड करण्यात आली. प्रिफेक्ट पदावर अथर्व कदम, यश उदगिरे, हर्ष काळे, नेहा जोडराणे, सिद्धी काडवदे, किरण पाटे, निखिल राठोड, रमशा पठाण यांची निवड करण्यात आली. डिसिप्लिन लीडर म्हणून राजनंदिनी बेंडकुळे हिची निवड झाली. सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक शपथ घेतली. या सर्व विदयार्थी परिषदेतील मेंबर्सना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बॅचेस, देऊन गौरविण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थाध्यक्षांनी तसेच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्राचार्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शिक्षिका रत्ना यादव तर आभार संगमेश्वर ढगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुपरवयाजार गोविंद वलसे, क्रीडा विभाग प्रमुख इस्माईल शेख, राहुल अडसूळ, विक्रम गायकवाड, दुर्गा शिंदे,  तसेच सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतली. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

Post a Comment

0 Comments