सफाई कामगारांचा सन्मान सोहळा
लातूर : अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने सफाई कामगार व स्वच्छता कामगारांचा सत्कार सन्मान सोहळा दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजता भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात येथे आयोजित करण्यात आला आहे. कष्टकरी, कामगार, सफाई कामगारांचा 31 जुलै हा सफाई कामगार बलिदान दिवस म्हणून देशातल्या अनेक जिल्ह्यात साजरा केला जातो. तो लातूर जिल्ह्यातही साजरा करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रा. डॉ. माधव गादेकर हे भूषविणार आहेत. लातूर मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे, लातूर पोलीस उपाधिक्षक गजानन भातलवंडे, सहाय्यक आयुक्त कामगार लातूर विभाग मंगेश झोले, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, भारतीय भटके विमुक्त जाती जमाती संघटना अध्यक्ष प्राध्यापक सुधिर अनवले, लातूर जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अविनाश देशमुख, अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष राजकुमार होळीकर या मान्यवरांच्या हस्ते आदर्श, गुणवंत स्वच्छता कामगारांचा सत्कार, सन्मान करण्यात येणार आहे.
या सत्कार सोहळ्याचे आयोजन केंद्रीय कार्यकारिणीचे सचिव शिवाजी भंडारे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य सुरेश काटे, लातूर शहराध्यक्ष अंकुश टगळगे, प्रमोद बानाटे, किशोर सगर,मंगल शिंदे, महिला आघाडी प्रमुख नूतन अंगरखे, अहिल्या इंगळे, मजिद बागवान, सुरेश काळे, महेंद्र कांबळे, युसुफ शेख आदी मान्यवरांनी केले आहे.



0 Comments