Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन

लातूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन


लातूर : महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबतचा अधिनियम २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पञक जा.क्र. पोमसं/२४/३४/अंधश्रध्दा विधेकयक ५७८/२०१३ दि.१९/०८/२०२१ आन्वये प्रत्येक पोस्टेला जादुटोना प्रतिबंधक कक्ष स्थापण करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. त्याअनुशंगाने पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांचे आदेशावरून अपर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली अंध्दश्रध्दा निर्मुलन आणि जादुटोना अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी लातुर जिल्हयामध्ये पोस्टेनिहाय कक्ष स्थापण करण्यात आले आहेत.

व त्याचे नोडल ऑफीसर म्हणुन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, लातूर संजीवन मिरकले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पोलीस स्टेशन स्तरावर एक अधिकारी  दोन पोलिस अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली असून जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत येणाऱ्या तक्रारी वर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments