शेखर कांबळे युवा भीमसेना जिल्हाध्यक्षपदी
औसा: तालुक्यातील उटी(बू) गावचे रहिवासी तथा गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळीत स्वतःला वाहून घेतलेले नवयुवक शेखर कांबळे हे विविध सामाजिक संघटनेत काम केले असून त्यांना त्यांच्या कामाची दखल म्हणून युवा भिम सेना संस्थापक अध्यक्ष पंकज काटे यांनी आतापर्यंत त्यांनी त्यांच्यासोबत राहून केलेले सामाजिक कार्य याची दखल घेत त्यांना थेट जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याकरिता नूतन युवा भिमसेना जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्याचे काम करताना भूमिपुत्र असलेल्या औसा तालुक्यातील प्रत्येक गावची समस्या आहे ती स्वतःची समस्या समजून त्या समस्यांना विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेत न्याय द्यावा अशी अपेक्षा ही जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे सांभाळत असताना आणि शुभेच्छा देताना औसा तालुक्यातील नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत. यामुळे भविष्यात त्यांच्या हातून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने समर्थपणे सांभाळण्यात यावी आणि त्या जिल्हाध्यक्ष पदाला न्याय मिळेल असे साजेशे कार्य शेखर कांबळे यांच्या कार्यातून घडो आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय,आधार मिळो अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.


0 Comments