Latest News

6/recent/ticker-posts

अल फारुख उर्दू विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा

अल फारुख उर्दू विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा 


नळेगाव : नळेगाव येथील अल फारुख उर्दू विद्यालयात गुरुवारी (दि.२२) दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासनदिन साजरा केला. यावेळी मुख्याध्यापक तांबोळी सोहेल उपमुख्याध्यापक खुरैशी अरजान लिपिक म्हणून बागवान अफ्फान यांनी काम पाहिले. शिक्षक म्हणून दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अध्यापनाचा अनुभव घेतला. या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष नजीब जागीरदार यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक वहाब जागीरदार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कादिर जागीरदार, मुजीब शेख, समद शेख, हुसेन घोरवाडे, युनूस शेख, इस्माईल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. स्वयंशासनदिनाच्या यशस्वीतेसाठी हाश्मी मोईनोद्दीन, इरशाद पिरजादे,लायक सौदागर, मुंजेवार बाबू, साहेबलाल कुरैशी, इलयास शेख, नुरोद्दीन तांबोळी, फय्याज सय्यद,इनामदार उस्मान, जमील पटेल, महेबूब शेख, रफिक कासार सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व दहावीच्या विधार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments