निलंगा तालुक्यातील जि. प. शाळा आनंदवाडी गौर निपुण अभियानात १०० टक्के यशस्वी
लातूर : निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत घेतलेल्या चाचणी परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडी, गौर (तालुका निलंगा) येथील सर्व विद्यार्थी निपुण झाल्याबद्दल शाळेचा सत्कार करण्यात आला.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सभागृह, जिल्हा परिषद लातूर येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तृप्ती अंधारे आणि निलंगा तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी संतोष स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, "हा सन्मान माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी, सहकारी सुवर्णा कांबळे, माजी मुख्याध्यापिका आनिता शिंदे, केशव चामे, एस. जी. बबने(शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), समिती सदस्य, गावातील शिक्षणप्रेमी नागरिक, मार्गदर्शक केंद्रप्रमुख विजयकुमार धुमाळ आणि गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांचा आहे. जि. प. शाळा गौर यांचेही सहकार्य लाभले." लातूर जिल्ह्यातील ५६ निपुण शाळांपैकी २० शाळा निलंगा तालुक्यातील असल्याने गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांचा मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



0 Comments