छत्रपती शाहू जुनिअर कॉलेजची निकालाची यशस्वी परंपरा कायम
निटुर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या मार्च 2026 एचएससी इ .12 वी बोर्ड परीक्षेत छत्रपती शाहू जुनिअर कॉलेजची याही वर्षी उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवलेली असून महाविद्यालयाचा एकूण 92.35% टक्के निकाल लागला आहे.
यात विज्ञान शाखेचा 99 टक्के, कला शाखेचा 80 टक्के वाणिज्य शाखेचा 87 टक्के निकाल लागलेला आहे. महाविद्यालयातून या वर्षी एकूण 160 विद्यार्थी 12 वी परीक्षेस प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी दोन विद्यार्थी विशेष प्राविण्यात, 74 विद्यार्थी प्रथम श्रेणी तर 65 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. केंद्रात व महाविद्यालयातून मानसी मोहन बादाडे 77 टक्के गुण घेऊन प्रथम संस्कृत(100 गुण), सिमरन माजीद शेख 75.50% गुण द्वितीय आणि समिक्षा विजयकुमार सावंत 74 टक्के गुण मिळवलेले आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव तथा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, प्राचार्य अनिल सोमवंशी, प्रा. संतोष सोमवंशी, प्रा. सौ. भाग्यश्री सोमवंशी, प्रा. कदम चंद्रकांत, प्रा. जाधव जितेंद्र, प्रा. कांबळे शरद, प्रा. जाधव सतिष, प्रा. वाघमारे सतिष. प्रा. इंगलवाड विष्णुदास. प्रा. सौ. भारती अश्वीनी. प्रा. अमोल सोमवंशी, प्रा. भोजने सचिन आदी शिक्षक व कर्मचारी वृंद, पालकांनी गुणवंताचे अभिनंदन केले.
कला शाखेतून प्रज्ञा किशन वन्ने 68.17 टक्के गुण प्रथम मेहराज अजम्मोद्दीन शेख 68.50 टक्के द्वितीय अनुसया गोरोबा शिंदे 68 टक्के घेऊन तृतीय आलेली आहे. वाणिज्य शाखेतून ऋतिका सिध्दार्थ कांबळे 66 टक्के घेऊन प्रथम, विशाल सतिश जगदाळे 59 टक्के द्वितीय, रोहित दिनकर कवडे 55 टक्के तृतीय घेवुन उत्तीर्ण झाले आहेत.

0 Comments