Latest News

6/recent/ticker-posts

नवी मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या बारावी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश; अझीझ पटवेकर प्रथम

नवी मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या बारावी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश; अझीझ पटवेकर प्रथम


कळंबोली कॉलेजचा विद्यार्थी ९१ टक्क्यांसह अव्वल

नवी मुंबई : सेंट झेवियर जोसेफ सायन्स कॉलेज, कळंबोली येथील विद्यार्थी अझीझ रशीद पटवेकर याने महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत ९१.०० टक्के एकूण गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. यात त्याने गणित विषयात १०० पैकी १०० पूर्ण गुण मिळविले आहेत.

कॉलेजमध्ये द्वितीय क्रमांक रिया विवेकानंद दुबे यांनी ८८.३३ टक्के गुणांसह तर तृतीय क्रमांक पूजा जोतीराम जगताप यांनी ८७.३३ टक्के गुणांसह निश्चित केला आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतील उत्कृष्ट निकालाची छाप पाडली आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारीवृंद, पालक आणि मित्रपरिवारातून अभिनंदन होत आहे. या यशाने कॉलेजची शैक्षणिक उत्कृष्टता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Post a Comment

0 Comments